दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी । अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी । वारी वारीं जन्ममरणांतें वारी । हारी पडलो आतां संकट निवारी ॥१॥
दुर्गे दुर्घट भारी
Durge Durghat Bhari
Navratri · Devi puja (Maharashtra) · Marathi
॥ धृपद ॥
जय देवी जय देवी महिषासुरमथिनी । सुरवर ईश्वरवरदे तारक संजीवनी ॥धृ॥
त्रिभुवनीं भुवनी पाहतां तुज ऐसें नाहीं । चारी श्रमले परंतु न बोलवे कांहीं । साही विवाद करितां पडिले प्रवाहीं । तें तूं भक्तांलागी पावसि लवलाहीं ॥२॥
प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा । क्लेशांपासुनि सोडवि तोडी भवपाशा । अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा । नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥३॥
॥ शुभं भवतु ॥


